पिंपरी-चिंचवडमध्ये जोरदार   

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात सोमवारी मुसळधार पाऊस झाला. सकाळी सुरू झालेला पाऊस रात्री उशिरापर्यंत सुरु होता. त्यामुळे रस्त्यांना ओढ्यांचे स्वरूप आले होते.
गेले काही दिवस पिंपरी-चिंचवडमध्ये  पाऊस पडत आहे. काल सकाळी ११ पासून जोरदार पावसाला सुरुवात झाली. सायंकाळी सहापर्यंत पावसाचा जोर कायम होता. त्यानंतर, रात्रीदेखील पाऊस सुरू होता. मुसळधार पावसाने आकुर्डी, प्राधिकरण भागातील अनेक सोसायट्या आणि घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले.
 
आकुर्डी रेल्वे स्टेशन ते चिंचवड स्टेशन रस्त्यावर तसेच पिंपरीतील तपोवन मंदिर रस्त्यावर, पुणे-मुंबई महामार्गावर पाऊस साचला होता. पुणे-मुंबई महामार्गावर मेट्रोचे काम सुरू आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी खड्डे झाले आहेत. ग्रेड सेपरेटर प्रकल्प तसेच बीआरटीमुळे रस्ता अतिशय चिंचोळा उपलब्ध आहे. त्यातच, मेट्रोच्या कामामुळे रस्त्यावर चिखल झाल्याने चालकांना वाहने चालविताना चांगलीच कसरत करावी लागत होती. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्यावतीने स्मार्ट सिटी आणि अर्बन स्ट्रीट डेव्हलपमेंटच्या नावाखाली शहरात विविध भागात मोठ-मोठे पदपथ आणि सायकल ट्रॅक उभारण्यात आल्याने वाहतुकीसाठी उपलब्ध रस्ते छोटे झाले आहेत. त्याचाच अनेक भागात ड्रेनेज तुंबून पाणी रस्त्यावर आल्याने नागरिकांनी पालिकेच्या कारभाराबाबत नापसंती व्यक्त केली. 
 

Related Articles